शरद रासकर की रिपोर्ट
महाराष्ट्र। शिवप्रताप दिन मार्गशीर्ष कृ 7 शिवशके 349 बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर सायंकाळी साडेपाच वाजता नातूबाग पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे. शिवप्रतापदिन या उत्सवाची ओळख आता महाराष्ट्रभर झालेली आहे आणि तो सर्वत्र साजरा केला जातो पुण्यातल्या मावळ्यांनी शिवप्रताप दिनाच्या उत्साहाचा प्रतापगडावर 1996 साली प्रारंभ केला ही गोष्ट कधीच विसरता येणार नाही. स्वर्गीय शाहीर योगेश आणि स्वर्गीय निनादराव बेडेकर या दोन महान शिवभक्तांनी सुरुवातीच्या कार्यक्रम साठी खूप कष्ट घेतलेले आहेत. यंदा बुधवार 30 नोव्हेंबर 2022 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी या दिवशी शिवप्रतापदिनाचा उत्सव होणार आहे,पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि शिवप्रेमी मंडळे या कार्यक्रम साठी एकत्र येतील ।
336 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस शासनाच्या हातोड्याने 10 नोव्हेंबर 2022 या दिवशी प्रतापगडावरील बेकायदेशीर असणाऱ्या अतिक्रमणाचा सुपडा साफ केला.प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा अतिरेक्यांच्या वास्तव्यांनी कलंकित झाली होती आता शासनाने तो कलंक पुसून टाकून महत्त्वाचे राजकीय कर्तव्य पार पाडले आहे आणि शिवरायांची अनोख्या पद्धतीने पूजा बांधली आहे. या वर्षात शिवप्रताप दिनासाठी ही घटना अतिशय प्रेरणादायी आहे प्रतापगड उत्सव समितीने सर्वप्रथम 26 वर्षांपूर्वी अफजलखानाच्या थडक्या भोवती झालेले अतिक्रमण उघडून टाकण्यासाठी चळवळ सुरू केली होती आणि त्यासाठी आंदोलने केली, जनजागृती केली, प्रसंगी कारावास भोगला, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि न्याय सुद्धा पदरात पाडून घेतला. या शिव कार्यामध्ये समितीचे कार्याध्यक्ष श्री मिलिंद रमाकांत एकबोटे यांचा सिंहाचा वाटा होता याचा आम्हाला अभिमान वाटतो ज्या ज्या मंडळांनी शिवरायांचे अवमूल्यण करणारे अतिक्रमण उखडून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या जनजागृती साठी परिश्रम घेतले त्यांच्यासाठी यंदाचा शिवप्रताप दिन हा सोनियाचा दिन ठरणार आहे.
हिंदवी स्वराज्य भूषण वीर जीवा महाले पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात येणार असून विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री श्री शंकरराव गायकर हे यावर्षीच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच चाकण येथील संग्राम दुर्गाच्या ठिकाणी असलेले यावनी अतिक्रमण शासनामार्फत हटवणारे शिवभक्त किरण झुंजुर्के यांना याप्रसंगी हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.वारजे येथील लहुजी यात विरुद्ध संघर्ष करणारे श्रीराम कुंभार यांचाही विषय सन्मान याप्रसंगी करण्यात येणार आहे.पक्ष संघटना भाषा जात या भेदभावना मूठ माती देऊन भगव्या झेंडा खाली पुण्यातील सगळे शिवभक्त या नात्यांनी एकत्र आले तर आई जगदंबेचा आशीर्वाद लाभेल जसे साडेतीनशे वर्षांपूर्वी देशद्रोहाविरुद्ध शिवरायांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र लढला होता विजय झाला होता तसाच विजय जगदंबेच्या आशीर्वादाने पुण्यातील शिवभक्तांना प्राप्त होईल असा आम्हाला विश्वास वाटतो तेव्हा वाजत गाजत या शिवरायांचा जयजयकार आसमात घुमू द्या शिवप्रताप दिनाचा जल्लोष पुण्यातील हिंदू समाजाला शक्ती उत्सव आणि प्रेरणा देईल यासाठी आपण आपले कर्तव्य पार पाडूया.तरी सर्व शिवभक्तांनी सदर कार्यक्रमासाठी पुणे शहरात मोठ्या संख्येने यावे असे आवाहन प्रतापगड उत्सव समिती चे कार्याध्यक्ष व पुणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे यांनी केले.
या कार्यक्रमाची नियोजन बैठक शिवाजीनगर येथे मिलिंद भाऊ एकबोटे यांच्या कार्यालयात पार पडली यावेळी प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष संजय भोसले, बापूसाहेब काळे संस्थापक अध्यक्ष शिव राज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य , शरदराव रासकर संपर्कप्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा , प्रदेश उपाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान , विजय शेठ बेनके अजित वि का सो संचालक ,सुहास पासलकर, अभिजित वाघचौरे,महेश काळे श्री शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते। यासर्वांच्या उपस्थित मध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे येथे आढावा बैठक पार पडली.तसेच मिलिंद भाऊ एकबोटे यांच्या वतीने शंभुराजे छत्रपती यांचे पुस्तक भेट देण्यात आले या निमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित होते अशी माहिती शरदराव रासकर प्रदेश उपाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान, अध्यक्ष लोकक क्रांती सेना पुणे जिल्हा यांनी दिली आहे।