Site icon Pratap Today News

स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांचे शिष्टमंडळ आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या भेटीला

सरद पटेल की रिपोर्ट

महाराष्ट्र। संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य शासनाकडे छत्रपती शिवरायांचा व छत्रपती शंभूराजांचा दैदीप्यमान इतिहासाचा वसा व वारसा जतन व्हावा या दृष्टिकोनातून राज्य शासनाकडे मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी स्वराज्य संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विश्वविक्रमी कीर्तनकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर, कार्याध्यक्ष व जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे, राज्यउपाध्यक्ष श्री.बाबासाहेब दिघे, पुणे जिल्हाध्यक्ष माऊलीआबा कुंजीर,

अध्यात्मिक आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोडके, अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय श्री संजय राठोड, माननीय खासदार श्रीकांत शिंदे, माननीय खासदार भावनाताई गवळी, माननीय खासदार हेमंत पाटील, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख शरद दादा सोनवणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश चिवटे, थेऊरचे युवराज काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना वारकरी संप्रादयाचे भुषण असलेले विना, पगडी, चिपळ्या, उपरणे, हार घालून सन्मानित करण्यात आले. खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

१) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला, राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळून द्यावा व शिवजयंती शाळा कॉलेजेस शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी.
२) छत्रपती शिवराय व छत्रपती शंभुराजे यांचा दैदिप्यमान इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.
३) श्रीक्षेत्र वढू व श्रीक्षेत्र तुळापूरला विशेष तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून द्यावा.
४) छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी शाळा कॉलेज शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करावी.
५) इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी.
६) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाणाचे श्री.शिवनेरीगड व छत्रपती संभाजी महाराजांचे जन्म ठिकाणाचे श्री.पुरंदरगड असे नामकरण करावे. अशा मागण्या केल्या.

यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले अशी माहिती स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याचे सचिव श्यामकांत निघोट व राजेश कान्हूरकर यांनी दिली।

Exit mobile version